Skip to main content

Posts

Showing posts from September, 2017

टपरीवरच्या ओव्या

टपरीवरच्या ओव्या अरे शिक्षक शिक्षक जणू घाण्याचा बैल सदा कदा ONLINE घरी वैतागली बाईल अरे शिक्षक शिक्षक WHATSAPP WHATSAPP खेळ ONLINE च्या नादामंदी बिघडलाय सारा मेळ अरे शिक्षक शिक्षक कसा शिजवतो खिचडी वाट पाहून कंटाळली वर्गातली बछडी अरे शिक्षक शिक्षक कोणी होई वार्ताहर पुढार्यांचे  काढी फोटो शाळा पडते मोकार अरे शिक्षक शिक्षक साहेबाला हिंडवीतो जो इमाने काम करी त्याला कारे भंडावीतो अरे शिक्षक शिक्षक नाही चालत वेबसाईट म्हणून बारमध्ये होतो बिचारा टाईट अरे शिक्षक शिक्षक लई दिवस वाईट जरी चालली साईट नाही टिकत लाईट अरे शिक्षक शिक्षक त्याला किती टेन्शन जल्म्भर खपून भागून नाही त्याला पेन्शन RMESH WAGH 9921816183