असा तो... तो एकटाच रस्त्याने तंद्रीतच चालत असतो दर दोन पावलावर सारखा सारखा वळत असतो याच्या चपला कायमच झिजलेल्या खरबुड्या फाटल्या तरी शिवून शिवून पुन्हा त्याच घालत असतो रोज खड्ड्यांचा रस्ता तो तसाच तुडवत असतो मागून येणाऱ्या बाईकची उगीच वाट पाहत असतो मुलगा लहान असताना नाही घेतली सायकल आता मुलगा बी.फार्म.झालाय हा उगीच खिसा चाळत असतो उदास झालीत सारी स्वप्ने त्याच्या नवरीने पाहिलेली हा आश्वासने उसनी बिचारीला देत असतो तो १५ वर्षापासून विनानुदानित शाळेत शिक्षक आहे सगळ्याच कथेतला दरिद्री नायक शेतकरी असत नसतो रमेश वाघ,पेठ,नाशिक, ९९२१८१६१८३
Comments
Post a Comment