Skip to main content

Posts

Showing posts from 2019

काव्य

काव्य जस जसे माझे यौवन सरू लागले तस तसे मला काव्य स्फुरू लागले ||१|| कोरडेच निघाले पावसाचे नक्षत्र सारे आता कुठे जरासे मेघ झरू लागले ||२|| सोडला सहज हातातला तेव्हा आता कुठे आठवांनी नेत्र पाझरू लागले ||३|| ऐकलेना कधी गीत प्रणयाचे तेव्हा उगाच आज आता तुझे बोल स्मरू लागले ||४|| कवटाळल्या गारगोटी लाथाळून माणिकमोती स्वार्थी आप्त सारे आता विसरू लागले ||५|| रमेश वाघ, नाशिक.९९२१८१६१८३ आमचे हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी फोटोवर क्लिक करा.