स्वार्थी ती......
जिच्यावर
जीव उधळला
मागचा
पुढचा विचार सोडून
तिने
मात्र जाळं टाकलं होतं
व्यवहाराचा
गणित मांडून
तिला पाहताच काळजातून
उठली होती कसलीशी कळ
तिनेही असंच सांगितलं ; पण
जमवून भविष्याचा मेळ
मी
फारच खुशीत होतो
कुणीतरी
प्रेमात पडलंय म्हणून
तिचा
मात्र फायदा होता
आता
काय लाभ बिघडलंय म्हणून ?
रमेश
वाघ,पेठ,नाशिक,
९९२१८१६१८३
अगदी खोलवरची मनाच्या मनातलं सांगणारी काव्यांजली
ReplyDelete