दुर्दैवाने
आज पुन्हा सापडलाय
सरस्वती
आणि सुदाम मुंडेचा वारस
हा
स्त्री सक्षमीकरणाचा गर्भपात नाही
मानुसाकीचाच
गर्भपात झालाय
व्हय
महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!
ज्यांचा
HDI जास्त,GDP जास्त
ज्यांच्या
श्रीमंतीचा बोलबाला झालाय
तिथेच
आज नीचपणा घडलाय
व्हय
महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!
न जाणो
किती जिजाऊ सावित्री आणि
अहिल्या
असतील त्या निरागसांत
कदाचित
उद्याची सानिया ,साक्षी
आणि
सायनाही ......पण....
ह्या
नराधमाने भविष्यकाळाच गाडलाय
व्हय
महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!
फुले
शाहू आंबेडकर
टिळक
रानडे आगरकर
यांच्या
वैचारिक संचिताचा
वारसा
आम्ही कधीच सोडलाय
व्हय
महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!
कसं
सांगू हा महाराष्ट्र
शिवबा,तुकोबा
अन विनोबाचा आहे
अरे
त्या महत्म्यांचा आत्माही स्वर्गामध्ये अवघडलाय
व्हय
महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!
हे
स्वर्गस्थ महात्म्यांनो!!!!
जमले तर
माफ करा आम्हाला
सगळ्या
क्षेत्रातला आमचा INDEX जरी वाढलाय
पण
तुम्ही रुजवलेला विवेकाचा कोंब आम्ही खुडलाय
व्हय
महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!
रमेश वाघ, पेठ,नाशिक.
९९२१८१६१८३
Comments
Post a Comment