Skip to main content

Posts

Showing posts from 2017

टपरीवरच्या ओव्या

टपरीवरच्या ओव्या अरे शिक्षक शिक्षक जणू घाण्याचा बैल सदा कदा ONLINE घरी वैतागली बाईल अरे शिक्षक शिक्षक WHATSAPP WHATSAPP खेळ ONLINE च्या नादामंदी बिघडलाय सारा मेळ अरे शिक्षक शिक्षक कसा शिजवतो खिचडी वाट पाहून कंटाळली वर्गातली बछडी अरे शिक्षक शिक्षक कोणी होई वार्ताहर पुढार्यांचे  काढी फोटो शाळा पडते मोकार अरे शिक्षक शिक्षक साहेबाला हिंडवीतो जो इमाने काम करी त्याला कारे भंडावीतो अरे शिक्षक शिक्षक नाही चालत वेबसाईट म्हणून बारमध्ये होतो बिचारा टाईट अरे शिक्षक शिक्षक लई दिवस वाईट जरी चालली साईट नाही टिकत लाईट अरे शिक्षक शिक्षक त्याला किती टेन्शन जल्म्भर खपून भागून नाही त्याला पेन्शन RMESH WAGH 9921816183

व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!

दुर्दैवाने आज पुन्हा सापडलाय सरस्वती आणि सुदाम मुंडेचा वारस हा स्त्री सक्षमीकरणाचा गर्भपात नाही मानुसाकीचाच गर्भपात झालाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! ज्यांचा HDI जास्त, GDP जास्त ज्यांच्या श्रीमंतीचा बोलबाला झालाय तिथेच आज नीचपणा घडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! न जाणो किती जिजाऊ सावित्री आणि अहिल्या असतील त्या निरागसांत कदाचित उद्याची सानिया ,साक्षी आणि सायनाही ......पण.... ह्या नराधमाने भविष्यकाळाच गाडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! फुले शाहू आंबेडकर टिळक रानडे आगरकर यांच्या वैचारिक संचिताचा वारसा आम्ही कधीच सोडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! कसं सांगू हा महाराष्ट्र शिवबा,तुकोबा अन विनोबाचा आहे अरे त्या महत्म्यांचा आत्माही स्वर्गामध्ये अवघडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! हे स्वर्गस्थ महात्म्यांनो!!!! जमले तर माफ करा आम्हाला सगळ्या क्षेत्रातला आमचा INDEX जरी वाढलाय पण तुम्ही रुजवलेला विवेकाचा कोंब आम्ही खुडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!    ...

असा तो...

  असा तो... तो एकटाच रस्त्याने तंद्रीतच चालत असतो दर दोन पावलावर सारखा सारखा वळत असतो याच्या चपला कायमच झिजलेल्या खरबुड्या फाटल्या तरी शिवून शिवून पुन्हा त्याच घालत असतो रोज खड्ड्यांचा रस्ता तो तसाच तुडवत असतो मागून येणाऱ्या बाईकची उगीच वाट पाहत असतो मुलगा लहान असताना नाही घेतली सायकल आता मुलगा बी.फार्म.झालाय हा उगीच खिसा चाळत असतो उदास झालीत सारी स्वप्ने त्याच्या नवरीने पाहिलेली हा आश्वासने उसनी बिचारीला देत असतो   तो १५ वर्षापासून विनानुदानित शाळेत शिक्षक आहे सगळ्याच कथेतला दरिद्री नायक शेतकरी असत नसतो                  रमेश वाघ,पेठ,नाशिक,                  ९९२१८१६१८३

स्वार्थी ती.....

                       स्वार्थी ती...... जिच्यावर जीव उधळला मागचा पुढचा  विचार सोडून तिने मात्र जाळं टाकलं होतं व्यवहाराचा गणित मांडून              तिला पाहताच काळजातून              उठली होती कसलीशी कळ              तिनेही असंच सांगितलं ; पण              जमवून भविष्याचा मेळ मी फारच खुशीत होतो कुणीतरी प्रेमात पडलंय म्हणून तिचा मात्र फायदा होता आता काय लाभ बिघडलंय म्हणून ?                             रमेश वाघ,पेठ,नाशिक,                             ९९२१८१६१८३